प्रतिनिधी:-
समाधानदादांच्या विकासाभिमुख धोरणांची यशस्वी अंलबजावणी करून, पूर्ण झालेल्या, सुरु असलेल्या व प्रस्तावित विकास कामांच्या माध्यमातून जनतेचा मतरुपी आशीर्वाद मिळवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या गावभेट प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने “भाजप महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधानदादा आवताडे” व मा. आमदार प्रशांतजी परिचारक मालक यांनी तावशी या गावाला भेट देऊन येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी महायुती सरकारच्या माध्यमातून दादांनी राबवलेल्या योजना व विविध विकासाच्या धोरणांच्या माध्यमातून झालेली गावातील लोककल्याणकारी विकास कामे जनतेसमोर मांडली.
आपल्या मतदारसंघात पायाभूत सुविधांची पूर्तता आणखी प्रभावीपणे करण्यासाठी व प्रस्तावित कामे जलद गतीने पूर्ण करवून घेण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचा विजय महत्वाचा आहे, असं स्पष्ट मत समाधानदादा यांनी मनोगतातून व्यक्त केलं.
तसेच आपण सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर आज मतदारसंघात विकासात्मक बदल घडले आहेत, याचप्रकारे पुढील काळातही आपल्या गावाला आणखी विकसित करण्यासाठी २० तारखेला ‘कमळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड जनाशीर्वादाने समाधानदादांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवून आपल्या सेवेची संधी द्यावी, असे आवाहन मा. प्रशांत मालक यांनी केले.
सदर प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.