भीमा नदीमध्ये पोहायला गेलेली चार शाळकरी मुले गेली वाहून

सोलापूर – पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथील भिमा नदीपाञात मामीसह भाचा बुडाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी चार शाळकरी मुले बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना 
दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथे शनिवारी दुपारी ३:३० वाजता घडली. यामध्ये तीन मुली व एका मुलाचा समावेश आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की  भीमा नदीत पोहायला गेलेल्या शिवाजी तानवडे यांच्या मागे त्यांच्या दोन मुली आणि गावातच राहणाऱ्या त्यांच्या बहिणीचा नऊ वर्षांचा मुलगा व 11 वर्षांची मुलगी हे दोघेही  आले. यापैकी १३ वर्षाच्या दोन  मुलीला पोहायला येत असल्याने त्या दोघीही नदीत उतरल्या. त्यानंतर पोहायला न‌ येणारे नऊ वर्षीय मुलगी आणि 11 वर्षांचा मुलगाही पाण्यात उतरला. माञ अचानकपणे हे चारही मुले पाण्यात बुडत असल्याचे पाहून तानवडे यांनी दोन मुलांना धरले आणि नदी काठावर आणून सोडले. नदी काठावर आल्यानंतर पाणी थोडे असल्याने ते दोघेही सुखरूप राहतील असे  वाटले. त्यानंतर ते दुसऱ्या दोघांना आणायला नदीत  गेले. मात्र पाण्याचा  प्रवाह वाढल्याने चारही मुले डोळ्यादेखत वाहुन गेल्याची हृदयविदारक घटना घडली. समीक्षा शिवाजी तानवडे वय 13 वर्ष इयत्ता आठवी, अर्पिता शिवाजी तानवडे वय 12 वर्ष इयत्ता 7 वी,  आरती शिवानंद पारशेट्टी वय 12 वर्ष.  7 वी,  विठ्ठल शिवानंद पारशेट्टी वय  10 वर्ष 5 वी असे भिमा नदीत बुडालेल्या चार मुलांची नावे आहेत. दरम्यान या मुलांचा शोध मोहीम‌ हाती घेण्यात येत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here