पंढरपूर प्रतिनिधी…
सार्वजनिक आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष यांच्यावतीने महाराष्ट्रातील आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मणी या दैवताच्या आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरांमध्ये वारकरी भाविक भक्त हे आळंदी ते पंढरपूर हे पायी चालत येत असतात. या वारकरी बांधवांना भावीक भक्तांना आरोग्य विषयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरू असून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वतीने वारकऱ्यांच्या शारीरिक मानसिक स्वास्थ जपण्याच्या उद्देशाने हे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व राज्य आरोग्य मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अथक प्रयत्नातून हे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. याचा लाभ पंढरपूर शहरांमध्ये आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणारे भाविक भक्तांना होणार आहे 65 एकर या परिसरामध्ये हे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. या ठिकाणी संपूर्ण वैद्यकीय सोयी सुविधा तसेच औषधे व अतिदक्षता कक्ष या सर्व आरोग्य विषयक सुविधा या उपलब्ध करून ठेवलेले आहेत. याचा लाभ भावी भक्तांना होणार आहे कित्येक भाविक भक्त याचा लाभ घेत आहेत.
आळंदी ते पंढरपूर या अडीचशे ते तीनशे किलोमीटर अंतरामध्ये वारकरी भावीक भक्तांच्यासाठी महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले असून याचा लाभ वारकरी भावीक भक्तांना होत आहे. वारकरी भाविक भक्तांच्या मधून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.