*पंढरपूर अर्बन बँक सहकार क्षेत्रातील ग्रीन वर्ल्ड पुरस्काराने सन्मानित*

प्रतिनिधी:-
आंतराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल ग्रीन वर्ल्ड को-प्राईड पुरस्कार आपल्या दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूरला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार मा.श्री.बाबासाहेब पाटील, सहकार आयुक्त मा.श्री.दीपकजी तावरे यांच्या शुभहस्ते प्रदान करणेत आला, शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या आपल्या बँकेस ही सन्मानाची बाब असल्याचेही बँकेचे चेअरमन श्री.सतीशजी मुळे यांनी यावेळी नमूद केले.
ग्रीन वर्ल्ड व कॉसमॉस को-ऑप.बँक लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार मंथन 2025 हा कार्यक्रम सहकार सभागृह, कॉसमॉस टॉवर, शिवाजी नगर, पुणे येथे संपन्न झाला. हा पुरस्कार बँकेचे वतीने संचालक श्री.पांडुरंग घंटी, श्री.गणेश शिंगण, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.उमेश विरधे व व्यवस्थापक श्री.गणेश हरिदास, योगेश जगताप यांनी स्विकारला अशी माहिती बँकेचे चेअरमन श्री.सतीशजी मुळे यांनी दिली. सध्या बँकेने गृह व वाहन कर्जा बरोबरच महाराष्ट्र शासनाच्या आण्णासाहेब पाटील, वसंतराव नाईक, आई अशा विविध व्याज परतावा योजनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून कर्ज पुरवठा करीत आहे, त्याचा फायदा व्यवसाय वृध्दीसाठी घ्यावा असे आवाहन यावेळी श्री.मुळे यांनी केले.
सदर कार्यक्रमास महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात काम करीत असणाऱ्या बहुसंख्य बँकांचा समावेश होता. महाराष्ट्र सहकारी बँकेचे प्रशासक श्री.विद्याधर अनास्कर, कॉसमॉस बँकेचे सीए मिलींदजी काळे, ग्रीन वर्ल्डचे गौतम कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here