प्रा.जयंत आसगावकर आणि हर्षदा देशमुख – जाधव यांच्या प्रचारार्थ आज पंढरपुरात शिक्षक व पदवीधरांचा मेळावा

*प्रा. जयंत आसगावकर आणि हर्षदा देशमुख – जाधव यांच्या प्रचारार्थ शिक्षक व पदवीधरांचा मेळावा*

पंढरपूर:-
पंढरपूर / प्रतिनिधी :

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या विधान्परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी पंढरपूरात भव्य प्रचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. जयंत दिनकर आसगावकर आणि पदवीधर मतदारसंघांच्या अधिकृत उमेदवार सौ. हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारार्थ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा सोमवारी सायंकाळी ५ वाजता पंढरपूर येथील इसबावी परिसरातील श्रीराम मंगल कार्यालयात होणार आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला गती देण्याबरोबरच शिक्षक व पदवीधर मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे.पुणेविभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणुक महत्त्वपूर्ण असून, महाविकास
आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी
सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मेळाव्यास पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व शिक्षक, पदवीधर मतदार, काँग्रेस पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. एकजुटीने सहभागी होऊन महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला बळ द्यावे, ही नम्र विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित या मेळाव्याला शिक्षक व पदवीधर मतदारांसह सर्व कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here