सोलापूर जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू राहणार | पहा काय सुरू आणि काय बंद असणार

सोलापूर – राज्यामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, गेल्या महिन्याभरात ज्या प्रतिबंधित क्षेत्रांमधील परिस्थिती नियंत्रणात आली किंवा ज्या भागांमधील पॉझिटिव्ही रेट हा 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा भागांसाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारने अशा भागांमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील किराना दुकाने, मेडिकल, दुध डेरी, तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकानांची वेळेबाबत सविस्तर नियमावली प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे.
गेल्या महिन्याभरापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमालीचा वाढला होता त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कडक लॉकडाऊन केला होता. मात्र आता १ जून पासून सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये किराणा, मेडिकल्स, भाजीपाला, दुध डेअरी, बेकरी, सर्व खाद्य पदार्थांची दुकाने , चिकन, मटण,मासे, तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने आता सकाळी ७ ते 11 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.
तसेच सार्वजनिक वाहतूक, टॅक्सी, आटो रिक्षा सेवा या सुरू राहतील.
त्यामुळे पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
  • पाहुयात कोणत्या सेवा बंद व कोणत्या सुरू असणार आहेत

ग्रामीण भागात काय सुरू काय बंद पहा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला, मात्र काय सुरू काय बंद राहणार हे मात्र सांगितले नाही, दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नवा आदेश काढला काय आहेत नवीन आदेश काय असेल नव्याने सुरू पहा हे आदेश
त्याअथी, मी मिलिंद शंभरकर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सोलापूर जिल्ह्यात सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना (कोव्हीड- १९) विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटणेसाठी दिनांक ०१.०६.२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वा. पासून ते दि. १५.०६.२०२१ रोजी सकाळी ०७.०० वा. पर्यंत खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करत आहे.
1. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ आणि रात्रीची संचारबंदी लागू करणे : 11. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये (पोलीस आयुक्तालय सोलापूरची हद वगळून) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३
कलम १४४ लागू करण्यात येत आहे..
b. खाली नमुद केलेल्या वैध कारणाव्यतिरिक्त नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरता येणार नाही. c. या आदेशामध्ये नमुद केलेल्या सुट देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा / आस्थापना वगळून सर्व सार्वजनिक ठिकाणे, सेवा या बंद राहतील.
d. अत्यावश्यक सेवा म्हणून खाली नमुद केलेल्या सेवा आणि उपक्रम हे या आदेशामधून वगळण्यात येत असून त्याबाबतची सर्व कामे व वाहतूक सुरळीत चालू राहील. ८. या आदेशामध्ये नमूद करणेत आलेल्या अपवादात्मक सुट दिलेल्या वर्गवारीमध्ये समाविष्ट केलेल्या सेवा आणि आस्थापना यांना कामाच्या दिवशी सकाळी 7.00 वा. ते रात्री 8.00 वा. या दरम्यान सुट देणेत आलेली असून
त्यांच्या हालचाली व सेवा सुरू ठेवणेविषयी नमूद केलेल्या कालावधीमध्ये प्रतिबंध असणार नाही. f. सुट दिलेल्या श्रेणीतील घरगुती काम करणारे कर्मचारी / वाहनचालक परिचर यांच्या बाबतीतचा निर्णय स्थानिक परिस्थीती पाहून स्थानिक प्रशासना मार्फत घेण्यात येईल. 2. अत्यावश्यक सेवांमध्ये खाली दिलेल्या बाबी समाविष्ट असतील. :
1) हॉस्पीटल डायग्नॉस्टिक सेंटर, क्लिनीक लसीकरण, वैद्यकीय विमा संबंधी कार्यालये, फार्मसी, फार्मस कंपन्या आणि इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवेमध्ये समाविष्ट असणारे उत्पादन व वितरण करणारे घटक तसेच त्यासंबधी डिलर्स आणि त्यांची वाहतुक व वितरण तसेच लसी, सॅनिटायझर मास्क, वैद्यकिय उपकरणे व त्याच्याशी निगडीत सर्व सहायक बाबी, कच्च्या मालाचे उत्पादन घटक आणि त्यासंबंधित सेवा यांचा समावेश असेल. (2) पशुवैद्यकिय सेवा पशुसंगोपन केंद्र
3) सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी आणि सर्व प्रकारच्या खाद्य पदार्थाची दुकाने (चिकन, मटन, कॉचडया, मासे व अंडी यांचेसह), पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने
सकाळी ०७.०० ते ११.०० वा. पर्यंत चालू राहतील,
4) शितगृहे आणि वखार विषयक सेवा, 5) सार्वजनिक वाहतूक विमानवाहतुक, रेल्वे, टैक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक वाहतूकांच्या बसेस 6) विविध देशांच्या राजदुतांची कार्यालयांशी संबंधीत सेवा
7) स्थानिक प्रशासनामार्फत करावयाची मान्सून पूर्व कामे.
8) स्थानिक प्रशासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा. 9) रिझर्व बैंक ऑफ इंडिया आणि रिझर्व बैंक ऑफ इंडिया ने अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता दिलेल्या सर्व
10) SEBI आणि SEBI ने मान्यता दिलेले मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टीट्यूशन जसे की स्टॉक एक्चेंज, डिपॉझीटरीज आणि क्लेरींग कार्पोरेशन तसेच SEBI शी रजिस्टर असलेल्या इंटरमेडोअरीज 11) टेलिकॉम सेवेशी संबंधित असणा-या देखभाल दुरुस्ती विषयक सेवा,
12) मालवाहतूक 13) पाणीपुरवठा विषयक सेवा
14) कृषी निगडीत सेवा आणि कृषी उत्पादन विषयक सर्व सेवा सुरळित सुरु राहण्यासाठी बियाणे, खते, कृषी अवजारे व त्यांची दुरुस्ती त्यांचेशी संलग्नित सर्व उपक्रम चालू राहतील. सदर आस्थापनांची वेळ सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० वा पर्यंत राहील.
(15) सर्व व्यापारी माल (Commodity) संबंधित आयात निर्यात 16) ई-कॉमर्स (केवळ अत्यावश्यक सेवा व मालाच्या पुरवठ्यासाठी
17) प्रसार माध्यमांचे अधिस्वीकृतीधारक प्रतिनिधी, 18) पेट्रोलपंप आणि पेट्रोलिअमशी निगडीत ऑफशोअर ऑनशोअर उत्पादने
(19) सर्व प्रकारच्या कामी सेवा
(20) डेटा सेंटर/ क्लाऊड सेवा / माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत क्रिटीकल इन्फास्ट्रक्चर आणि संबंधित सा
(21) शासकिय आणि खाजगी सुरक्षा सेवा (22) इलेक्ट्रीक आणि गैस पुरवठा सेवा.
23) बैंक ATM 24) पोष्ट सेवा
(25) बंदर आणि बंदराशी निगडीत सेवा,
26) कस्टम हाऊस एजंट / लसीच्या / जीवरक्षक औषधे / फार्मास्यूटीकल उत्पादन वाहतुकोसंबंधित असणारे
लायसन्स धारक मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटरर्स,
(27) अत्यावश्यक सेवेला पुरवठा करणा-या कच्चा माल / पैकेजिंग मटेरिअल पुरवठा करणा-या सेवा (28) येऊ घातलेल्या पावसाळयाकरिता वेगवेगळया संस्था व वैयक्तिक वापराकरता आवश्यक मालाचे उत्पादन
करणारे घटक
29) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता दिलेल्या इतर सेवा

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here