*काळेंची शेती फायद्यात अन् कारखाना मात्र तोट्यात!* *अभिजीत पाटील*

पिराची कुरोली येथील सभेत चेअरमन अभिजीत पाटील यांचा काळे यांना टोला

पंढरपूर प्रतिनीधी/-

सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचे २३कोटी रुपये थकीत बिल आहे. यामधून भंडीशेगाव मधील एका तरुणाचे बत्तीस हजार रुपये देण्यासाठी कारखान्याकडे बिल नाही. ही बाब खेदाची आहे.ग्रामीण भागातील सर्वसाधारण मजुरीला जाणाऱ्या महिलेकडे जाऊन पाहिलं तरी एवढी रक्कम असू शकते. चेअरमन काळे यांनी कारखान्यातील कारभारापेक्षा आपल्या शेतीकडे लक्ष दिल्याने शेती फायद्यात आणली आहे अन् कारखाना मात्र तोट्यात असल्याचे भासवत आहेत. असा टोला चेअरमन अभिजीत पाटील यांनी काळे यांना लगावला आहे.

तालुक्यातील पिराची कुरोली येथे बुधवारी सायंकाळी सहकार शिरोमणी विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित बैठकीत अभिजीत पाटील बोलत होते. यावेळी डॉ बी. पी. रोंगेसर, दीपक पवार अमरजीत पाटील, बाळासाहेब कोलगे यांच्यासह विठ्ठलचे संचालक उपस्थित होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, चालू हंगामातील गाळप मधून 120 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. परंतु शेतकऱ्यांचे 66 कोटी रुपये देणे अद्याप बाकी आहे. ते देणे दिले नाही.शेतकऱ्यांना दिले नाही. असा आरोपही चेअरमन अभिजीत पाटील यांनी केलाआहे.

या बैठकीत बोलताना अमरजीत पाटील म्हणाले,चेअरमन कल्याणराव काळे यांनी सहकारी शिरोमणी साखर कारखाना याचे चेअरमन झाल्यापासून कधीच सभासदांचे कल्याण व्हावे अशा पद्धतीने पावली उचलली नाहीत तसेच शेतकऱ्यांचे कधी या कारखान्यापासून समाधान व्यक्त झाले नाही. उलट शेतकऱ्यांवरती सहकारी शिरोमणीची आपल्या स्वतःच्या हक्काच्या उसाची बिले वेळेत न मिळाल्यामुळे कर्जाचा डोंगर होऊन त्यांच्यावर आर्थिक संकटे आले आहे. या लोकांच्या गाड्यावरती गाड्या घेण्याचे प्रकार सुरू आहेत मात्र शेतकरी व सभासद यांच्या घरामध्ये कधी गाडी येऊ नये अशी या कल्याणकाळें ची भूमिका आहे. नाव जरी कल्याण असले तरी प्रवृत्ती मात्र खूप वाईट आहे.सभासदांच्या कडे तसेच कार्यकर्त्यांकडे घरात सायकल राहील का नाही याची गॅरंटी नाही. जनकल्याण हॉस्पिटलमध्ये किती लोकांना मोफत औषध उपचार मिळाले हे पाहणे खूप महत्त्वाचे तसेच सहकार शिरोमणी कारखान्याच्या सभासदाचे शेतकऱ्यांचे येणाऱ्या काळात कल्याण झाले पाहिजे.

पुढे बोलताना अमरजीत पाटील म्हणाले,दुष्काळ असताना गुरसाळ्याच्या बंधार्‍यांमधून पाणी शिल्लक असताना याच नेत्यांनी मोठ-मोठे जनरेटर लावून बेकायदेशीर रित्या पाणी पळवले आहे . ते जनरेटर पोलीस स्टेशनला चार दिवस होते.भाटघरचे पाणी कालवा फोडून कारखान्याला कोणी घेतले सगळ्या तालुक्याला माहित आहे.खोटे बोलण्याची सुरुवात सहकार क्षेत्रामध्ये कल्याणराव काळे यांच्यापासून झाली आहे.
सहकारी शिरोमणी निवडणुकीमुळे पंढरपूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा विचार करण्याची मोठी वेळ आली आहे.मुळात राज्यात सहकार स्थापन होत असताना यशवंतराव चव्हाण यांनी धनाजीराव गाडगीळ असतील या लोकांनी सहकार स्थापन करत असताना सहकाराशिवाय उदार नाही अशी भूमिका मांडली होती. यशवंतराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांची मुले गाड्यावरती फिरली पाहिजे अशी भूमिका होती. मात्र चेअरमन कल्याणराव काळे यांची भूमिका फक्त आपणच मोठे झाले पाहिजे शेतकरी आणि सभासद यांच्या घरी सायकल सुद्धा राहता कामा नये अशी वाईट प्रवृत्ती या चेअरमन कल्याणराव काळे यांची आहे .
कोर्टीच्या सभेमध्ये सभासदांना सांगतात वसंत दादा यांचे उपकार राखावे परंतु त्यांना उलट प्रश्न असा आहे की तुम्ही सभासद ,कार्यकर्ते यांचे उपकार याची जाण ठेवा व या निवडणुकीमधून तुम्ही माघार घ्या.
कारण आज तागायत सहकारी शिरोमणी साखर कारखाना याचे चेअरमन असल्यापासून कधीच सभासदांचे कल्याण व शेतकऱ्याचे समाधान तुमच्याकडून झाले नाही.

दीपक पवार यांनीही आपल्या भाषणात चेअरमन कल्याणराव काळे यांनी पाच ते सहा पक्ष बदललेले त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना त्यांनी निष्ठेची भाषा करू नये. असा सल्ला दिला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here