*मला संधी द्या, पश्चाताप करण्याची वेळ येऊ देणार नाही – अनिल सावंत*

* मारोळी येथील होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला अभूतपूर्व गर्दी

पंढरपूर प्रतिनिधी :-

आजपर्यंत जो माणूस माझ्यापर्यंत आपले काम घेऊन पोहोचला त्या प्रत्येक माणसाला न्याय मिळवून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यापुढेही मी ते अविरतपणे सुरू ठेवणार आहे. संत बागडेबाबा यांच्या दारात उभे राहून भल्याभल्यांची खोटं बोलण्याची हिंमत होत नाही. म्हणूनच मी संत बागडेबाबांच्या साक्षीने सांगतो की, तुम्ही जर मला येत्या विधानसभा निवडणुकीत संधी दिली तर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ देणार नाही असे प्रतिपादन भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी केले. मारोळी (ता.मंगळवेढा) येथील संत बागडेबाबा आश्रमात आयोजित होम मिनिस्टर या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी उपसरपंच रामचंद्र जाधव, आप्पासाहेब माने, गुलाब थोरबोले, बाळासाहेब शिंदे, रमेश पवार,कृष्णदेव लोंढे, चंद्रकांत देवकर, इंद्रजित पवार, तानाजी चव्हाण, नाथा काशिद, यशवंत होळकर, सुरेश कांबळे,आण्णा वाकसे, दादा बुरूंगले यांचेसह मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य इतर पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मारोळी येथील होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात महिलांनी अभुतपूर्व गर्दी केली होती.

यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, महिलांसाठी आयोजित केलेला होम मिनिस्टर हा कार्यक्रम केवळ तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित केला आहे. प्रत्यक्षात मला महिलांसाठी मोठे काम करायचे आहेत. मी सर्व स्तरातील लोकांसाठी माझ्या पद्धतीने काम केले आहे.
सिनेअभिनेत्री पूजा काळभोर यांच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला स्पर्धकांना शैलजा अनिल सावंत यांचे हस्ते वाटप करण्यात आले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here