*अपक्ष उमेदवार विक्रांत सज्जन आसबे यांचा प्रभाग 12 मध्ये होम टू होम प्रचार*

पंढरपूर:-

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचे पडघम वेगाने वाहू लागले आहेत. राजकीय पक्ष आणि विविध आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असतानाच, प्रभाग क्रमांक 12 मधील अपक्ष उमेदवार विक्रांत सज्जन आसबे यांनी आपल्या प्रचाराची दुसरी फेरी सुरू केली असून होम टू होम पुन्हा एकदा प्रचार रॅली सुरू केली आहे. आजवरच्या निवडणुकीचा अनुभव पाहता विक्रांत आसबे यांना मतदारातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
पंढरीच्या राजकारणात असबे परिवाराचे मोठे नाव आहे. आजवर त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये सहभाग नोंदवून विविध उमेदवारांना बळ दिले होते. त्या बाळाच्या जोरावर अनेकांना विजय मिळाला होता. याच कुटुंबातील सुशिक्षित युवक विक्रांत सज्जन असबे यांनी यंदाच्या या निवडणुकीत उडी घेतली आहे. विकासाचे व्हिजन त्यांच्यासमोर असल्यामुळे ,प्रभाग 12 मधील मतदारांना असबे परिवाराबाबत मोठी खात्री आहे. त्याचीच प्रचिती म्हणून प्रचार रॅली मधून मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
अपक्ष उमेदवार विक्रांत सज्जन आसबे यांनी यापूर्वी अनेकांच्या घरोघरी जाऊन ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर आता रॅलीच्या माध्यमातून विविध भागात त्यांचा प्रचाराचा दुसरा दौरा सुरू आहे.
या प्रचार रॅलीच्या माध्यमातून विसावा विठ्ठल मंदिर येथून विठ्ठलाचे आशीर्वाद घेऊन प्रचार रॅलीस सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये विठ्ठल मंदिराची पिछाडी बाजू, उमा नगर, शकुंतल नगर, शिक्षक कॉलनी, समता नगर, दूध डेरी पाठीमागील बाजू, आदी भागांमधून आपल्या प्रचार रॅली सुरुवात करण्यात आली आहे.
या प्रचार रॅलीमध्ये उमेदवार विक्रांत सज्जन आसबे, कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार असबे, उद्योजक हिम्मतराव आसबे, अजिंक्य असबे, सचिन डोईफोडे, महेश गांनमोटे,, धनंजय बडवे, अक्षय शिंदे नाईक अक्षय शिंदे नाईक, श्रीमती विजया सज्जन आसबे, सौ सुनिताताई हिम्मतराव आसबे, निशा जठार, सौ डोंगरे, सौ गायकवाड, परमेश्वर आसबे, अमेर
काझी, कृष्णा कोळी, अमित नागटीळक, सागर नागटिळक, संग्राम आसबे, सोमनाथ पाटील, जोतीराम पोरे, हर्षद माने, विजय खटावकर, लक्ष्मण गायकवाड, आदी प्रभाग क्रमांक 12 मधील विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here