*Equitas बँक फसवणूक प्रकरणात आरोपीस अंतरिम जामीन मंजूर*

पंढरपूर :-
पंढरपूर येथील Equitas Small Finance Bank मध्ये कर्जदारांनी कर्मचाऱ्याच्या संगनमताने फसवणूक केल्या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.
आरोपी महेश शेंडेकर यांचा अटकपूर्व जमीन अर्ज मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर केला होता.
ॲड. गणेश खटकाळे यांनी मा. उच्च न्यायालय मुंबई, कोल्हापूर खंडपीठ येथे आरोपीचा अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला व सदरील आरोपी यांचा या प्रकरणात काहीही दोष नाही, आरोपीला जाणून बुजून अडकवलेले आहे. आरोपी संपूर्ण प्रकारात तपासकामात सहकार्य करायला तयार आहेत, तसेच बोगस कागदपत्रे ही कर्जदारांनी बँकेत जमा केली आहेत असा युक्तिवाद केल्याने ॲड. गणेश खटकाळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
सदर केसकामी आरोपीतर्फे ॲड गणेश खटकाळे, ॲड अभय जाधवर, ॲड ऋतिक काशीद यांनी कामकाज पाहिले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here