मतदार संघातील तीन तालुक्यात मोठा निधीसाठी पाठपुरावा
पंढरपूर/प्रतिनीधी
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहे. मोहोळ राखीव विधानसभा मतदार संघातूनही इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू आहे.अशातच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी यंदाची निवडणूक लढवायची आणि जिंकायचीच यासाठी प्रयत्न सुरू ठेवले असून खरे यांच्या नावासाठी लोकप्रियता वाढल्याचे चित्र पाहावयास मिळू लागले आहे.
मोहोळ विधानसभा मतदार संघात तीन तालुक्यातील मतदार यांचा समावेश आहे. यामध्ये मोहोळ तालुक्याचा सर्व भाग, पंढरपूर आणि उत्तर सोलापूर या तालुक्यातील काही भाग आहे. यामुळे राजू खरे यांनी आता वरील तीनही तालुक्यातून आपला गवभेट दौरा वाढवीत, विविध समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
राजू खरे यांनी आपल्या गावभेट दौऱ्यात अनेक गावात आर्थिक मदत करीत मूलभूत प्रश्न मार्गी लावले आहेत. शासनाच्या वतीनेही कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे मोहोळ मतदार संघातील नागरिकांकडून आतापासूनच राजू खरे यांच्या उमेदवारीला पसंडी दर्शविली असल्याचे दिसू लागले आहे.
राजू खरे हे मूळचे कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जात आहेत. त्यात ते उद्योजक असल्याने या मतदार संघातील शिवसैनिकांतून खरे यांच्याबाबतीत आपल्याला खंबीर नेतृत्व मिळाल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे मोहोळ मतदार संघातील शिवसैनिकानी राजू खरे यांच्या उमेदवारीसाठी मागील अनेक दिवसापासून पसंदी दर्शविली आहे. यामुळे गावोगावी राजू खरे यांच्या नाव जनमानसात वाढत असल्याचे दिसत आहे.