*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी शंकरराव कदम तालुकाध्यक्षपदी रोहन नरसाळे*

पंढरपूर-

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार शंकरराव कदम यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी भक्ती मार्ग येथील उंच विठोबा ह.भ.प.महेश महाराज नलवडे यांच्या मठामध्ये पत्रकार संघाच्या सन २०२६-२०२७ करिता नुतनं पदाधिकाऱ्यांची निवड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

यामध्ये पंढरपूर शहर व तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात

तालुकाध्यक्षपदी रोहन नरसाळे, पंढरपूर शहर उपाध्यक्षपदी नितीन करंडे, शहर कार्याध्यक्षपदी प्रमोद भोसले, तर तालुका उपाध्यक्षपदी अतुल मोरे, तालुका कार्याध्यक्षपदी बाळासाहेब काशीद, संपर्कप्रमुखपदी स्वागत खपाले, सचिवपदी कुमार कोरे, प्रसिध्दी प्रमुखपदी विक्रम कदम यांची निवड करण्यात आली. यावेळी मार्गदर्शकपदी राधेश बादले-पाटील, रामदास नागटिळक यांची निवड करण्यात आली. यावेळी रविंद्र कोळी यांच्यासह विविध पत्रकार उपस्थित होते.

या निवडीनंतर पंढरपूर शहराध्यक्ष शंकरराव कदम म्हणाले की, २०२६-२०२७ या सालाकरिता माझी निवड करण्यात आली याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मी शहराध्यक्ष या नात्याने पत्रकारांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून शासनाच्या विविध योजनेचा लाभ पत्रकार बांधवांना मिळविण्यासाठी देखील कार्य करणार आहे असे त्यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here