*पंढरपूर, दि. ०४ :* राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते आरोग्यमंत्री आबिटकर यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी गणेश नि-हाळी, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आयुक्त संजय काटकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय सरडे, आरोग्य अधिकारी डॉ. महेश सुडके यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.




















