आ. समाधान आवताडे यांचा ५० वा वाढदिवस विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रमांनी साजरा

*दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बडेजाव न करता समाजभान जपण्यासाठी दिले प्राधान्य*

प्रतिनिधी-
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अनेक सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून दुष्काळ जन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर समाजभान जपण्याची सामाजिक बांधीलकी या निमित्ताने आणखी दृढ झाली आहे. पाण्याच्या भीषण अशा टंचाईग्रस्त दक्षिण भागामध्ये आमदार आवताडे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच म्हैसाळ योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये आल्याने शेतकरी आनंदून गेला आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत या मिशन अंतर्गत संपूर्ण मतदारसंघांमध्ये गावोगावी स्वच्छतेचा जागर करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वच्छतेसाठी झाडू हातात घेतला. सार्वजनिक व सामूहिक परिसरात यानिमित्ताने अनेकांनी स्वच्छता करत स्वच्छ गाव सुंदर परिसर हा नारा दिला. गोपाळपूर येथील वृद्धाश्रमामध्ये येथील मात्यापित्यांना व पालवी येथील अनाथ बालकाश्रम येथे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त भोजन देऊन त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला.

मतदारसंघातील नागरिकांचे व जनतेचे आरोग्य सदृढ आणि सक्षम होण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय तसेच भोसे, सलगर बु.व आंधळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भव्य मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नामांकित व तज्ञ आरोग्य अधिकाऱ्यांनी अनेक रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक आणि योग्य सल्ला देत उपचारासंदर्भात मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आवताडे स्पिनर्स प्रा. ली. येथे चेअरमन संजय अवताडे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक संवेदनशीलतेला आपल्या रक्तदानाच्या रूपाने सहकार्य केले. विविध गावातील प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून उद्याच्या उज्वल भारत देशाच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या यशस्वी पिढ्यांना शिक्षण साक्षरतेसाठी प्रोत्साहन देण्यात आले. पंढरपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे दोन महिन्याचा शिरा वाटप करण्यात आला पंढरपूर शहरात विविध ठिकाणी व अनवली येथे वारकऱ्यांना फराळ वाटप करण्यात आले.. मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमद्ये साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचे केंद्रप्रमुख राजाराम सुडके यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वातून वैष्णवी उद्योग समूह व वैष्णवी महिला को-ऑपरेटिव्ह यांच्या वतीने प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना वही व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. आमदार समाधान आवताडे यांच्या खर्डी येथील सीताराम महाराज, मारुती राया, कोर्टी येथील शंभू महादेव, हुलजंती येथील महालिंगराया त्याचबरोबर लक्ष्मी दहिवडी येथे लक्ष्मी देवी मंदिरात परिपूर्ण स्वास्थ्यसाठी आणि निरोगी आरोग्य संपन्न दीर्घायुष्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये ग्रामदैवतांना अभिषेक करून कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here