*नवरात्र महोत्सव तिसरी माळ निमित्त श्री विठ्ठल व माता रुक्मिणीचे राजस लोभस रूप पाहण्यास भाविकांची गर्दी*
पंढरपूर (ता.१३) घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास झाली आहे. या निमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे तिस-या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस श्री. तुळजाभवानी पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.
रूक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, कर्णफुले जोड,जडावाचा हार,नवरत्नाचा हार,जडावाचे बाजूबंद जोड, खड्यांची वेणी, चिंचपेटी हिरवी, पानाड्याचा हार, तनमणी मोठा, जवेची माळ, ठुशी, सरी,सोन्या मोत्याचे चांदवड, सूर्य पेठेची बिंदी, मन्या मोत्याच्या पाटल्या जोड, मोत्याचे मंगळसूत्र, मत्स्य जोड, पैंजणजोड, कंबरपट्टा, वाक्या जोड इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
तसेच श्री.विठ्ठलास प्रभावळीसह नक्षी टोप, नाम हिरयाचा, कौस्तुभ मणी, दंडपेठया जोड, हिऱ्याचे कंगन जोड, मोत्याचा तुरा, मस्त्य जोड, चंद्रहार १५ पदरी, पट्टीसहल लॉकेट, अष्टपैलू मण्याची कंठी आठ पदरी, अष्टपैलू मनाची कंठी तीन पदरी, पदकासह लॉकेट नऊ पदरी, लॉकेट पाच पदरी, चंद्रहार, तोडेजोड इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
तसेच राधिका मातेस सिद्धेस्वर टोप,ठुशी,पुतळ्यांची माळ, हायकोल, जवेची माळ, लक्ष्मीहार व सत्यभामादेवीला नक्षी टोप,हायकोल, जवेची माळ, जवमानी पदक तसेच महालक्ष्मी मातेस सोन्याचे गंठण, एकदाणी दंड पेट्या जोड, मोत्याची कंटीन दोन पदरी, शिरपेच, इमिटेशन नेकलेस, चांदीचा मत्स्य ,चांदीची छत्री, मोठी बोरमाळ इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत तसेच श्री.व्यंकटेशास सोन्याचा मुकुट, मोहरांची माळ,जावेची माळ, तांदळा हार,तुळशीची माळ, मोठा गोफ, चांदीचा कत्स्य, मोत्याची कंठी इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत
तसेच मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई,अंबाबाई,पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आला आहे. श्रीस परिधान करण्यात येणारे अलंकार अत्युत्कृष्ट व असामान्य कलाकुसरीचे तसेच पुरातन व दुर्मिळ आहेत. या अलंकाराचे *‘मकर कुंडले तळपती श्रवणी। कंठी कौस्तुभमणी विराजित।’* यांसारख्या अनेक अभंगांतून संतांनी वर्णन केलेले आहे.
नवरात्र महोत्सवानिमित्त श्री विठ्ठलास नऊ दिवस पोषाखावेळी अलंकार व रूक्मिणीमातेस विविध प्रकारचे पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात येत असल्याने, भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सन्मानिय सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवातील सर्व प्रथा व परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी सांगीतले.




















