भैरवनाथ शुगर लवंगी 13 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न

पंढरपूर:-
भैरवनाथ शुगर युनिट क्रमांक तीनमध्ये यंदाच्या गळीत हंगामासाठी ३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या निर्देशानुसार हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखाना प्रशासन प्रयत्नशील असून, उपलब्ध ऊस वेळेत गाळपासाठी आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी दिली.
तालुक्यातील लवंगी येथे भैरवनाथ शुगरच्या १३व्या गळीत हंगामानिमित्त बॉयलर अग्निप्रदीपन व मोळी पूजन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
कारखान्याचे मार्गदर्शक शिवाजीराव सावंत यांनी यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असली, तरी उपलब्ध ऊस वेळेत गाळपासाठी कारखान्यापर्यंत आणण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कारखाना प्रशासन प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते बॉयलर पूजन,
करण्यात आले. चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सुहास जाधव व त्यांच्या पत्नी अरुणा यांनी सत्यनारायण न पूजन केले.
ऊस वजन काट्याचे पूजन तसेच उसाने भरलेल्या वाहनांचे विधिवत पूजन पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे व नाथा काशिद यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीपती माने व त्यांच्या पत्नी चंद्रप्रभा यांनीही बॉयलर पूजन केले. या सोहळ्यास रतनचंद बँकेचे चेअरमन राहुल शहा, किसन गवळी, पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, आप्पासाहेब माने, सुधीर धुमाळ, दौलत माने, प्रतीक किल्लेदार, प्रशांत शिंदे, संतोष रंधवे, बंडू जाधव, जमीर इनामदार, सुदर्शन कसबे, नाथा काशिद, अमर सूर्यवंशी, श्याम गोगाव, संदीप तापडिया, समाधान जाधव, तानाजी चव्हाण, चंद्रकांत देवकर, गुरुनाथ ठिगळे, गणपत गाढवे, राजकुमार स्वामी, तानाजी इंगळे, नागेश लिगाडे, संतोष नागणे, भारत निकम व कृष्णा निकम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here