* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते सत्कार*
प्रतिनिधी :
पंढरपूर तालुक्यातील भालवणी येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते बुद्ध विहाराचे उद्धपटन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख तथा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य मा. संभाजीराजे शिंदे यांच्या
हस्ते ना. रामदास आठवले साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भालवणीचे उपसरपंच
नितीन शिंदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष कुमार भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन भोसले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
बुद्ध विहाराच्या उद्धपाटन सोहळ्यानिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमास स्थानिक नागरिक, बौद्ध बांधव आणि कार्यकत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी संविधानातील समता, बंधुता व सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर भर देत्त बुद्धांचे विचार समाजात अधिक प्रसारित करण्याचे आवाहन केले. बुद्ध विहार हे समाजप्रबोधन, शिक्षण, संस्कार आणि समता यांचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



















