श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक सरस्वती माता पोषाखासह अलंकार परिधान

पंढरपूर (ता.१४) :-
घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात झालेली असून, या निमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे चौथ्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस सरस्वती माता पोषाख परिधान करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.

श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, हिरा कंगनजोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी एक पदरी, मोत्याची कंठी मोती असलेली, मोत्याची कंठी दोन पदरी, तोडेजोड, मोहरांची माळ, मोठी बोरमाळ, पुतळ्यांची माळ, तुळशीची माळ, मत्स्य जोड, शिरपच मोठा दहा लोक असलेला, शिरपेच मोठा दोन लोलक असलेला इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

तसेच रुक्मिणी सोन्याचे मुकुट, मोठी नथ, कर्णफुले जोड, खड्यांची वेणी, पाचुची गरसोळी, चिंचपेटी हिरवी, तन्मणी मोठा, मद्रासी कंठा, ठुशी, तुळशीहार, सोन्या मोत्याचे ताणवाड जोड, चंद्र मोत्याचा कंठा, खड्याची बिंदी, मन्यामोत्याच्या पाटल्या जोड, मोत्यांचे मंगळसूत्र, सोन्याचे बाजूबंद कलमाडी, रुळजोड, पैंजणजोड, तारामंडळ इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

तसेच राधिका मातेस नक्षी टोप, ठुशी, पुतळ्याची माळ, चिंचपेटी पांढरी, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, व सत्यभामादेवीला चांदीचा मुकुट,लक्ष्मी हार,चिंचपेटी तांबडी,जवमनी पदक, जवेची माळ, हायकोल, पुतळ्यांची माळ, ठुशी इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत, तसेच श्री व्यंकटेशस सोने मुकुट, चंद्रहार १५ पदरी, मत्स्य चांदीचा, तांदळा हार ७ पदरी, जवेची माळ दोन पदरी इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहे.

तसेच मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आला आहे.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर व सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र महोत्सवातील धार्मिक विधी व परंपरांचे नियोजन करण्यात येत आहे. या महोत्सवाची तसेच धार्मिक परंपरांची माहिती विविध समाजमाध्यमांद्वारे भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here