*श्री विठ्ठल कारखान्याच्या चेअरमनपदाची अभिजीत पाटील तर व्हा.चेअरमनपदी प्रेमलता रोंगे*

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची गुरुवारी दि. 21) रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली ,होती यावेळी सर्व संचालकांनी एकमताने अभिजीत पाटील यांची विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी निवड केली तर व्हाईस चेअरमन पदी सौ.प्रेमलता रोंगें यांची निवड केली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नागेश पाटील यांनी काम पाहिले.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक पाच जुलै रोजी झाली. सहा जुलै रोजी मतमोजणी झाली. या वेळी श्री विठ्ठल शेतकरी परिवर्तन विकास आघाडीने 21 पैकी 20 जागा जिंकून सत्ता जिंकल्याचे स्पष्ट झाले. तिरंगी लढतीत विठ्ठल शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचे प्रमुख अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने भरघोस मतांनी विजय मिळवला.

नूतन संचालक मंडळामध्ये बहुतांश चेहरे तरुण आणि नवखे आहेत. .

कार्यस्थळावर संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आलेली होती.
संचालक मंडळात काही ज्येष्ठ मंडळीही आहेत, या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते सर्व नूतन संचालक मंडळ सभासद ऊस उत्पादक शेतकरी यांनी कारखानास्थळावर आनंद उत्सव साजरा केला

संचालक मंडळ कामाला लागले

मागील वर्षी विठ्ठल कारखाना बंद राहिलेला आहे. त्यामुळे आगामी हंगामात कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळ नेटाने कामाला लागल्याचे दिसून येते. निकालापासून सगळे कामाला लागले आहे, असे दिसते. मागील दीड वर्षे कामावर ब्रेकवर असलेल्या सर्व कामगारांना कामावर बोलावण्यात आले आहे. त्यांना थकीत पगारीपोटी काही रक्कम देण्यात आलेली आहे. ज्या संचालक व पदाधिकाऱ्यांकडे येणे थकबाकी आहे, ती वसुलीसाठी थकबाकीदारांना नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. उसाच्या नोंदी घेण्यासाठी शेती विभागाचे कर्मचान्यानी आठ दिवसांत सुमारे 7000 एकर उसाची नोंद घेतली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here