*माळशिरस येथील खून प्रकरणातील आरोपींना अटकपुर्व जामीन मंजुर*.

माळशिरस:-
माळशिरस येथील पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम 103(1), 109, 115(2), 3(5) प्रमाणे माळशिरस पोलीस स्टेशन गु.र.नं. २०५/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी बालाजी चिमाजी शेगर, चिमाजी बाबुराव शेगर, सोनाबाई चिमाजी शेगर यांचे विरूध्द गुन्हा दाखल झालेला होता. त्यानंतर सदर आरोपी तर्फे माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिन मिळणेसाठी अर्ज दाखल केला असता, मे. कोर्टानी आरोपींचा जामिन अर्ज मंजुर केला आहे.

त्यात हकीकत अशी की,

दिनांक १०/०४/२०२५ रोजी सायंकाळी ०७/०० वा चे सुमारास मयत दादा गोरख शिंदे सासरवाडी फुलेनगर ता. मळशिरस येथे त्याची पत्नी राधिका शिंदे हिस त्याचे घरी अंथुर्णे ता. इंदापुर जि. पुणे येथे घेवून जाणेसाठी आला असता पत्नी राधिका हिस त्याचे सोबत चल असे म्हणालेचे कारणावरून सासु सोनाबाई चिमाजी शेगर, सासरा चिमाजी शेगर यांनी शिवीगाळी करून हाताने मारहाण करून दोघांनी त्याचे हात धरून मेव्हाणा बालाजी शेगर याने अंगावर पेट्रोल टाकुन पेटवुन दिले आहे म्हणून त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सदर आरोपी तर्फे माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल करण्यात आला. सदर आरोपीच्या वकीलांनी सदर फिर्यादीमधील त्रुटी, विसंगती मे कोर्टाचे निदर्शनास योग्य त्या पुराव्यानिशी आणून दिल्यानंतर आरोपींच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राहय धरून सदर आरोपींना जामीन मंजुर केला आहे. यात आरोपीं तर्फे अॅड. दत्तात्रय नवनाथ सरडे, अॅड. सौ. सारीका माने-गायकवाड यांनी काम पहिले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here