*कमला एकादशीनिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचे वतीने भाविकांना फराळ वाटप*

पंढरपूर :-
आज बुधवार दि.२७/०५/२०२६ रोजी पुरूषोत्तम मासातील कमला एकादशीचे औचित्त साधुन श्री संत तुकाराम भवन येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती संचलीत अन्नछत्र येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर श्री संभाजीराजे शिंदे यांनी अन्नछत्राकरीता लागणारे फराळाचे सर्व साहित्य देऊन भाविक वारकरी भक्तांना फराळ वाटप केला. त्यावेळी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गुरूवर्य ह.भ.प.श्री गहीनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके, व्यवस्थापक श्री प्रविणकुमार घम, लेखाधिकारी श्री मुकेश अनेचा, विभाग प्रमुख श्री विनोद पाटील व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here