*कमला एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर आकर्षक फुल सजावटीने उजळले*

पंढरपूर दि.27:-
अधिक तथा पुरुषोत्तम मासातील कमला एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. श्री विठ्ठल भक्त पुणे येथील राम जांभुळकर यांनी सेवाभावी तत्त्वावर फुलांची व पानांची भव्य सजावट केली आहे.

या सजावटीसाठी झेंडू, शेवंती, अॅस्टर, गुलाब, निशिगंधा, तगर, लक्ष्मी कमळ, तुळशी, सूर्यफूल, ऑर्किड, अँथोरियम, कार्नेशन, जिप्सो, जरबेरा, कामिनी, अशोकाची पाने, ड्रेसिना, टेबल पाम, पिंक डेझी, ब्लू डेझी, सॅगऑफ, मनीप्लांट आदी बावीस प्रकारच्या फुलांचा व पानांचा वापर करण्यात आला आहे.

मंदिरातील चौखांबी, चोळखांबी, श्री संत नामदेव पायरी, व्हीआयपी गेट तसेच इतर प्रमुख ठिकाणी सुमारे एक ते दीड टन विविध फुले वापरून आकर्षक सजावट करण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here