पंढरपूर :-
विठुरायाच्या पंढरी नगरीमध्ये लाखोच्या संख्येने श्री विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्यासाठी त्याच्या आरोग्याची काळजी महाराष्ट्र शासन गेल्या काही वर्षापासून प्रत्येक यात्रेच्या काळामध्ये घेत असते. भाविकांच्या उत्तम आरोग्य करिता शासन सर्वतोपरी योजना राबवत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यावतीने आषाढी वारी निमित्त भव्य महारोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरचे महाआरोग्य शिबिर दिनांक 24 ते 27 जुलै 2026 रोजी संपन्न होणार असून शिबिराचे ठिकाण हे तीन रस्ता, पंढरपूर येथे असणार आहे
आषाढी वारी निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यावतीने भव्य महारोग्य शिबिर सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. या महाआरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी व वारकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन भव्य महाआरोग्य
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यावतीने करण्यात आले आहे.
विठू माऊलीच्या पंढरी नगरीत लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविक वारकरी भक्तांना या शिबिराचा लाभ होणार आहे. पंढरीचे वारकरी हे विठ्ठलाचे मुर्त स्वरुप म्हणून ओळखले जातात. लाखोच्या संख्येने भाविक भक्त आळंदी ते पंढरपूर पायी चालत येतात ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता ते विठूरायाच्या दर्शनासाठी, आपले सुखदुख विठूरायाला संगण्यासाठी वारकरी भाविक येत असतात.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहायतानिधी व मदत कक्ष, यांच्यावतीने यंदाच्या आषाढी यात्रा कालावधीत हजारोच्या संख्येने वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी, तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपचार यंत्रना ही राबवली जात आहे.
दिनांक 24 ते 26 जुलै या काळात पंढरपूर येथील तीन रस्ता चौक, सोलापूर बार्शी रोड, पंढरपूर या स्थळी महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.
तरी भाविक भक्तांनी या मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी भाविक भक्तांना कळवले आहे.


















