पंढरीत पालकमंत्री ना. गोरे यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठक संपन्न

 

पंढरपूर प्रतिनिधी :
शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे व पुणे विभागीय पदवीधर मतदारसंचाच्या अधिकृत उमेदवार सौ. स्मिताताई योगेश जाधव यांच्या प्रचारार्थ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पांडुरंग परिवार व परिचारक समर्थक पंढरपूर तालुक्यातील शिक्षण संस्थाचालक, पदवीधर मतदार व मुख्याध्यापक यांची सहविचारी सभा सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली मार्केट कमिटी सभागृहामध्ये पार पडली.

यावेळी सोलापूर जिल्हा भारतीय जनतीत पार्टी निरीक्षक माजी आमदार कुदन पाटील, मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. सुभाषराव माने सर, पंढरपूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती ॲड. वामनराव माने सर, मार्केट कमिटीचे सभापती हरीषदादा गायकवाड, व्हाइस चेअरमन राजूबापू गावडे तसेच तालुक्यातील पदाधिकारी, परिचारक प्रेमी, पांडुरंग परिवार प्रेमी व मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते. भाजपा व महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पसंती क्रमांक एकचे मत देऊन प्रचंड मतांनी निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला. कृषी उत्पत्र बाजार समिती येथील सभेनंतर सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयात काळे समर्थक शिक्षक आणि पदवीधरांचा मेळावा पार पडला. यावेळी चेअरमन कल्याणराव काळे, व्हाइस चेअरमन मोहन नागटिळक, माजी व्हाइस चेअरमन भारत कोळेकर यांच्यासह काळे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here