*वेळ ओळखा … युवराज पाटील यांच्या पाठीशी राहा – ज्ञानेश्वर माऊली जवळेकर*

बळीराजा शेतकरी संघटनेचे विठ्ठलच्या सभासदांना आवाहन

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर तालुक्यातील शेतकरी सभासदांनी युवराज पाटील गटाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. अण्णाभाऊ विकास पॅनलला मतदान करून, कारखान्याचे गतवैभव परत मिळवून द्यावे, असे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांनी केले. यावेळी युवराज पाटील ॲड. दीपक पवार गणेश पाटील आदींसह बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीचा झंजावाती प्रचार सुरु झाला आहे. जिल्ह्यातील बळीराजा शेतकरी संघटनेने युवराज पाटील गटाशी हातमिळवणी
केल्यामुळे , अण्णाभाऊ विकास पॅनलचा दबदबा आणखी वाढला आहे. बुधवारी बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी युवराज पाटील गटातील नेते मंडळींची भेट घेतली आणि पाठिंबा जाहीर केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बरोबरीने काम करणाऱ्या, बळीराजा संघटनेचे पंढरपूर तालुक्यात मोठे जाळे आहे. आजवर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नात भाग घेत त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. यामुळे बळीराजा शेतकरी संघटनेचा मोठा दबदबा पंढरपूर तालुक्यात आहे.
युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा अण्णाभाऊ विकास पॅनलच विठ्ठल कारखान्याचे दिवस पुन्हा आणू शकतो. कारखान्याचे गतवैभव पुन्हा मिळवून देऊ शकतो, असा विश्वास यावेळी ज्ञानेश्वर जवळेकर यांनी व्यक्त केला.

बुधवारी सकाळी येथील विठ्ठल हॉस्पिटलमध्ये बळीराजा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव शेळके, पंढरपूर तालुका अध्यक्ष रमेश भोसले, तालुका उपाध्यक्ष रामेश्वर झांबरे, युवा जिल्हा कार्याध्यक्ष रहीम मुलानी, युवा जिल्हा संघटक रमेश लंगोटे, तानाजी सोनवले, विष्णू भोसले, अनंत लामकाने, दत्तात्रय वरपे, लखन हाके यांच्यासह इतर बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठिंबाचे पत्र ॲड. दीपक पवार, गणेश पाटील आणि युवराज पाटील या पॅनल प्रमुखांकडे दिले. यावेळी युवराज पाटील गटातील अनेक नेते मंडळी उपस्थित होती.

*युवराज पाटील गटास बळीराजा शेतकरी संघटनेचा हात*

अण्णाभाऊ शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून युवराज पाटील गटाने कारखाना निवडणुकीत वादळ उडवून दिले आहे. आता बळीराजा शेतकरी संघटनेनेही याच गटास हात दिल्याने, ताकद आणखी वाढली आहे. बुधवारी सकाळी बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, आपल्या पाठिंब्याचे पत्र युवराज पाटील, गणेश पाटील आणि ॲड. दीपक पवार यांच्या हाती दिले. या पॅनलच्या वतीने बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here