*केंद्रीय रस्ते व वाहतूक मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन*

पंढरपूर, दि१४ :-
केंद्रीय रस्ते व वाहतूक मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी श्रींची मूर्ती व उपरणे देऊन त्यांचा सन्मान केला.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, नगराध्यक्षा प्रणिता भालके, माजी आमदार प्रशांत परिचारक,तसेच मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here