*अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २२९८ कार्यकर्त्यांनी केले रक्तदान*

*

पंढरपूर प्रतिनिधी/-

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या ३९व्या वाढदिवसानिमित्त गेल्या आठवड्या भरापासून पंढरपूर तालुक्यातील तुंगत, सुस्ते,आंबे,शिरगाव,,तरटगाव,वाडीकुरोली,भाळवणी,कौठाळी,आढीव,गुरसाळे,समृध्दी ट्रॅक्टर पंढरपूर, जळोली,चिंचोली-भोसे, सरकोली,तिसंगी,तावशी, बोहाळी, सोनके,खर्डी, गार्डी, देवडे,अनवली,खेडभाळवणी,चळे,मुंढेवाडी,रांझणी,विसावा,सह सह साखर कारखाना,भंडीशेगाव, देगाव, धोंडेवाडी,शेळवे,पिराची-कुरोली,शेगाव – दुमाला पळशी,सुपली,उपरी,वाखरी,येवती,उंबरे,कान्हापुरी बाभुळगाव, नांदोरे,गादेगाव,पुळुज, अशा अनेक पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचे आयोजन केले होते . ग्रामीण भागातील सामाजिक उपक्रम राबवत असताना अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिर घेण्यात आले असून अजूनही काही गावात रक्तदान शिबिर सुरू राहतील. आतापर्यंत जवळपास २२९८ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे .

अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीर, वृध्दाश्रम येथे खाऊ वाटप, चादर,पेन,वह्या,पुस्तक,शालेय साहित्य वाटप करण्यात आले होते.

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी विठ्ठल कारखान्याचे संचालक तसेच डिव्हीपी उद्योग समूहाचे सदस्यांनी परिश्रम घेतले.

*चौकट* – काल १ ऑगस्ट माझा वाढदिवस पंढरपूर तालुक्यातून विविध ग्रामीण भागातून जवळपास २हजारांपेक्षा जास्त सहकाऱ्यांनी व मिञ परिवाराकडून रक्तदान शिबीर व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सामाजीक बांधिलकी जपत आलो आहे त्यात माझ्या सहकार्यानी देखिल सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे यामुळेच माझ्या सहकाऱ्यांचा अभिमान वाटतो.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here