- महिलावर्गासह सर्वच मतदारांची मागणी
पंढरपूर:-
महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आणि जागोजागी निवडणूकीचे पडघम वाजु लागले. पंढरपूर तालुक्यातील वाखरी जि.प.गटाची जागा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव झालेली असून अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
वाखरी ग्रामपंचायतीच्या सन २००० ते २००५ या कालावधीत सरपंचपद भुषवून सर्व कारभार स्वतः पाहिलेल्या श्रीमती सुशिलाताई जगताप यांनी येत्या जि.प.निवडणूकीच्या रिंगणात ऊतरावं आणि निवडणूक जिंकावी यासाठी महिला वर्गासह सर्वच स्तरांतुन त्यांना पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्या सुशिक्षित असुन विद्यमान काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा ऊपाध्यक्ष आहेत.या अगोदर ता.अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात संपूर्ण तालुक्यात जनसंपर्क वाढवला आहे. १९८४ साली दहावी ऊत्तीर्ण असलेल्या श्रीमती जगताप यांंनी सरपंच पदावर असताना स्वतः ५ वर्ष पुर्णवेळ कारभार पाहिला आहे. त्यांना संधी दिल्यास वाखरी जि.प. गटाचा सर्वांगीण विकास करतील अशी चर्चा मतदारांमधुन होत आहे.
सरपंच असताना पंढरपूर तालुक्यात संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानमध्ये ग्रामपंचायतीला तालुक्यात सतत ५ वर्ष प्रथम क्रमांक, बिमा ग्राम योजनेत प्रत्येक कुटुंबाला विमा देण्याचे काम झाले.बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अर्थिक सक्षम करणे,लघु ऊद्योगास शासकीय योजना मिळवून देणे यासारखी कामे त्यांनी केली आहेत. यापूर्वी गुरसाळे जिल्हा परिषद गटामधून त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळी त्यांना फक्त १४० मताने पराभूत व्हावे लागले होते. त्या वेळची सर्व गावे चालू ज़िल्हा परिषद गटात असून फक्त नव्याने गादेगाव व उपरी या गावांचा समावेश झालेला आहे. साहजिकच जनसंपर्क व कामे या जमेच्या बाजू राहिलेल्या आहेत. वाखरी पंचक्रोशीमध्ये अजातशत्रू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामूळे त्यांना सर्वच स्तरातून निवडणूकीसाठी पाठिंबा मिळत आहे.
श्रीमती जगताप यांचे जेष्ठ चिरंजीव भारतीय आयुर्विमा महामंडळात विकास अधिकारी या पदावर कार्यरत असुन मराठा सेवा संघाचे सोलापूर जिल्हा संघटक आहेत. त्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क संपूर्ण तालुक्यात आहे. संघटनेच्या माध्यमातून सरकारी योजना ग्रामीण भागात पोचवण्याचे भरीव काम ते करत आहेत. कनिष्ठ चिरंजीव शेती क्षेञाशी संबंधित असुन डाळिंब निर्यातीत अग्रेसर आहेत.ते सध्या ३५० एकर डाळिंबशेती करार पद्धतीने करत असुन संपूर्ण शेतमाल निर्यात करत आहेत. त्यातून त्यांनी अनेकांना रोजगार दिला आहे.
साहजिकच शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या जगताप कुटूंबाकडुन मतदारांना सर्वांगीण विकासाच्या अपेक्षा आहेत.