*पंढरपूर अर्बन बँकेतर्फे कै.देशभक्त बाबुरावजी जोशी व्याख्यानमालेचे आयोजन*

पंढरपूर:-
दि पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि., पंढरपूर तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे सहकार सप्ताहाचे औचित्य साधुन कै.देशभक्त बाबुराव जोशी व्याख्यानामालेेचे आयोजन दि.14 ते 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत कर्मयोगी सभागृह, खवा बाजार, नवीपेठ, पंढरपूर येथील शाखेत करणेत आल्याची माहिती बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी दिली.

याप्रसंगी माहिती देताना ते म्हणाले, पंढरपूर अर्बन बँक यावर्षी 114 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सभासद, ग्राहक, हितचिंतक यांचे अर्थकारणाबरोबरच विविध प्रश्‍नांवर विचार मंथन होवुन समाजप्रबोधन व्हावे, यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करणेत आले आहे.

सदर व्याख्यानमालेचा शुभारंभ शुक्रवार दि.14 नोव्हेंबर 2025 रोजी सायं.6.00 वाजता आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक श्री.शैलेंद्र देवळाणकर, पुणे यांचे “ट्रम्प, टेरिफ आणि भारत” व्दारे होणार आहे. तसेच शनिवार दि.15 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ.नंदकुमार मुलमुले, नांदेड यांचे “यशाकडून समाधानाकडे” व रविवार दि.16 नोव्हेंबर 2025 रोजी एमएबी एविऐशनचे संचालक ज्येष्ठ पत्रकार श्री.मंदार भारदे, मुंबई यांचे “सुखी होण्याची तारीख ठरली का? ” याप्रमाणे व्याख्यान आयोजित केले आहे. सदर व्याख्यानमाला कर्मयोगी सभागृह, खवा बाजार, नवीपेठ, पंढरपूर येथे दररोज सांयकाळी 6.00 वाजता आयोजित केला आहे. या व्याख्यानमालेस रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

याप्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन माधुरीताई जोशी, संचालक रजनीश कवठेकर, हरिष ताठे, पांडुरंग घंटी, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, राजाराम परिचारक, अमित मांगले, अनंत कटप, गणेश शिंगण, ऋषिकेश उत्पात, व्यंकटेश कौलवार, मनोज सुरवसे, अनिल अभंगराव, गजेंद्र माने, तज्ञ संचालक अतुल कौलवार, प्रभुलिंग भिंगे, उदय उत्पात, सोमनाथ होरणे, शुभम लाड, संचालिका संगिता पाटील व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे आदी मान्यवर उपस्थित होते.

-: चौकट :-

शुक्रवार दि.14 नोव्हेंबर 2025 रोजी

आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, पुणे श्री.शैलेंद्र देवळाणकर यांचे विषय-ट्रम्प, टेरिफ आणि भारत

शनिवार दि.15 नोव्हेंबर 2025 रोजी

प्रसिध्द मानसोपचार तज्ञ, नांदेड .डॉ.नंदकुमार मुलमुले यांचे विषय-“यशाकडून समाधानाकडे” व

रविवार दि.16 नोव्हेंबर 2025 रोजी

एमएबी एविएशनचे संचालक ज्येष्ठ पत्रकार, मुंबई श्री.मंदार भारदे यांचे विषय-“सुखी होण्याची तारीख ठरली का?”

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here