*मतदार संघातील जनतेने सांगितले दगडूशेठ उभे राहा. आता माघार नाही- दगडूशेठ घोडके*

पंढरपूर ( प्रतिनिधी):-
लोक स्वतःहून म्हणू लागले दगडूशेठ आता सोलापूर लोकसभा मतदारसंघांमधून अपक्ष उमेदवारी भरा. असे पंढरपूर शहराचे माजी नगराध्यक्ष दगडूशेठ घोडके यांनी आज आपल्या मुलाखतीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले.
ज्यावेळी पंढरपूर लोकसभा मतदारसंघ होता. त्यावेळी रामदास आठवले यांच्या विरोधात मी उभा राहिलो. त्यावेळी दोन नंबरची मते मला मिळालेली आहेत. याची माहिती आणि जाणीव लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेला असल्यामुळे आणि मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश न करता अपक्ष अर्ज भरावा. अशी मागणी तमाम जनतेतून होत असल्यामुळे मी अपक्ष उमेदवारी भरणार आहे. पक्षाची बांधिलकी ही जाचक असल्यामुळे पक्षाचे म्हणण्यानुसार आपल्या मनाविरुद्ध देखील ऐकावं लागतं. त्यामुळे विकास काम करताना आडकाठी येत असते. म्हणून मी अपक्ष उमेदवारी भरून या लोकसभेला मी निवडून येणार आहे.
आपल्या मनोगतामध्ये पुढे बोलत असताना दगडूशेठ घोडके म्हणाले पंढरपूर मधील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी एमआयडीसीची मागणी मी दिल्ली दरबार मध्ये करणार आहे. या मागणीसाठी मी संसदेच्या बाहेर बाहेर उपोषण देखील करायला तयार आहे .त्याचप्रमाणे सोलापुरातील एमआयडीसी ही ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवून या भागातील बेरोजगारांचा प्रश्न मी सोडवणार आहे.
मी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उपरा नाही. मी मजरेवाडी सोलापूर येथील रहिवासी असून येथे माझे घर आहे. त्या परिसरामध्ये मी रेणुका मातेची भले मोठे मंदिर बांधलेले आहे. या मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी हजारोच्या संख्येने या परिसरातील, ग्रामीण भागातील लोक जमा झाले होते. या लोकांनीच मला दगडूशेठ तुम्ही आता लोकसभेसाठी उभे राहा. अपक्ष उभे राहून तुम्ही आपली कारकीर्द सुरू ठेवा. जनतेचे काम करत राहा. असे मला लोकांनी आग्रह केल्यामुळे आणि त्याच प्रमाणे हे सर्व लोक निधी गोळा करून मला लोकसभेसाठी उभा करणार आहेत. आता माघार कदाचित घेणार नाही .असे माजी नगराध्यक्ष दगडूशेठ घोडके म्हणाले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here