महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत मिळवले अवॉर्ड
देशात दुसर्या तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकांवर असणाऱ्या समृद्धी ट्रॅक्टर, पंढरपूर यांना पुणे येथे *सोनालिका ट्रॅक्टर सेल अवॉर्ड* देण्यात आला.
पुणे येथे झालेल्या सोनालिका कंपनीच्या कार्यक्रमात समृद्धी ट्रॅक्टरला सेल्स अवॉर्ड प्राप्त झाला असून समृद्धी ट्रॅक्टरच्या सेल्समन यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ट्रॅक्टरची अधिक माहीती देऊन ट्रॅक्टरची विक्री केल्याने महाराष्ट्र नंबर एकवर समृद्धी ट्रॅक्टर्सला प्रथम अवॉर्ड मिळाला. लकी ड्रॉ, शेतकरी योजना, अशा शेतकऱ्यांच्या निगडित असणारे उपक्रम राबवून शेतकऱ्यांत विश्वासाचे नातं जपणारे समृद्धी ट्रॅक्टर नेहमीच ग्राहकांना फायदा करून देते.
सोनलिका ट्रॅक्टर खरेदी करून सोनलिकाला आपली पसंती
9असल्याचे दाखवून दिले आहे. याप्रसंगी सोनालिका कंपनीचे झोनल हेड संदीप सिंग, स्टेट हेड बलजिंदर सिसोदिया , रिटेल हेड उमेश गुप्ता यांच्या हस्ते समृद्धी ट्रॅक्टरचे अभिजीत कदम, मॅनेजर सोमनाथ केसकर, हनुमंत पोरे, बाळासाहेब मोरे, विक्रम डूबल, बालाजी परदेशी, राजेंद्र जगताप, हरिदास डूबल यांना अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.