*महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी वीरेंद्रसिंह उत्पात*

*पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी रविंद्र शेवडे*

*सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी दत्ताजीराव पाटील*

 

– महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीची कार्यकारिणीची बैठक सोलापूर येथे पार पडली. यावेळी संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार, कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे उपस्थित होते.
यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी विरेंद्र उत्पात, सोलापूर जिल्हा संघटक रविंद्र शेवडे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी दत्ताजीराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आज पत्रकार दिनाच्या दिवशी श्रीसंत दामाजी मठ येथे त्यांचा सत्कार शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला. दत्ताजीराव पाटील यांचा सत्कार प्रदेशाध्यक्ष रामभाऊ सरवदे यांच्या हस्ते, रविंद्र शेवडे यांचा सत्कार पंढरपूर शहर अध्यक्ष चैतन्य उत्पात यांनी केला. तर विरेंद्र उत्पात यांचा सत्कार प्रदेशाध्यक्ष रामभाऊ सरवदे यांचे वतीने केला. (सदर सत्कार चैतन्य उत्पात यांनी स्विकारला.)
यावेळी कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामभाऊ सरवदे यांनी मनोगत व्यक्त करतांना सुरक्षा समितीच्या कार्याची माहिती दिली. पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या अनेक वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन रोजना, राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता, प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांसाठी विमा योजना, आरोग्य योजना, अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे, पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे, पत्रकारांच्या पाल्यासाठी शिष्यवृती देणे, खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी, पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्‍नावर पत्रकार सुरक्षा समितीचे वतीने आंदोलन, उपोषण, निवेदन याच बरोबर पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती राज्यसरकारकडे पत्रव्यवहार करत असून पत्रकारांचे प्रश्‍न सोडविन्याचा प्रयत्न करीत आहे.
सदर प्रसंगी रामभाऊ सरवदे, चैतन्य उत्पात, विश्‍वास पाटील, दिनेश खंडेलवाल, लखन साळुंखे, रामकृष्ण बिडकर, विठ्ठल जाधव, विकास सरवळे, अमर कांबळे, महेश कदम आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here