*आमदार समाधान आवताडे यांच्या शिरगाव मधील सभेस प्रचंड प्रतिसाद*

शिरगाव, ता. पंढरपूर.:-
समाधानदादांच्या सततच्या पाठपुराव्याने गावातील पूर्ण झालेल्या व सुरु असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेचा मतरुपी आशीर्वाद मिळवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या गावभेट प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने “भाजप महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधानदादा आवताडे” व मा. आमदार प्रशांतजी परिचारक (मालक) यांनी शिरगाव या गावाला भेट दिली. यावेळी महायुती सरकारच्या माध्यमातून दादांनी राबवलेल्या योजना व विविध विकासाच्या धोरणांच्या माध्यमातून झालेली गावातील लोककल्याणकारी विकास कामे जनतेसमोर मांडत उपस्थितांशी आ. समाधानदादा व मा. आमदार प्रशांतजी परिचारक (मालक) यांनी हितगुज करत संवाद साधला.

गावाचा विकास हीच समाजकारणाची मुख्य प्रेरणा मानून, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मूलभूत सुविधा गावात आणण्यात यश मिळाले आहे. पुढील काळात आपण अधिकाधिक प्रगतीच्या दिशेने काम करू. शेतकरी बांधवांसाठी अधिकाधिक अनुदान योजना, महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी, तरुणांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी २० तारखेला ‘कमळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड जनाशीर्वादाने निवडून द्यावे, असे आवाहन या निमित्ताने केले.

सदर प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here