मंगळवेढा तालुक्यातील आम आदमी पक्षाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष मा. एकनाथ फटेजी मंगळवेढा जिल्हा उपाध्यक्ष मा. ज्ञानेश्वर बाबरजी, मंगळवेढा शहराध्यक्ष मा. भारत शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला पाठिंबा दिला. अशी माहिती राष्ट्रवादीचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे उमेदवार अनिल सावंत यांनी दिली
आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर भाजपने ईडी सीबीआयचा गैरवापर करून तुरुंगात टाकले. संजय राऊत, अनिल देशमुख यारख्या एकनिष्ठ आणि निष्पाप नेत्यांनाही जेलमध्ये टाकले. उद्या भाजप सत्तेत राहिले तर तुमचे दुकान कधी बंद करायचे, आणि कधी चालू करायचे, हे भाजपवाले ठरवतील. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत येणे फार आवश्यक असल्याचं सांगत आपण ही लढाई निश्चित जिंकू, असा विश्वास तालुकाध्यक्ष एकनाथ फटे साहेबांनी व्यक्त केला.