*राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल सावंत यांचा धर्मगाव, ढवळस, देगाव, शरदनगर, घरनिकी, मारापुर, गुंजेगाव, लक्ष्मीदहिवडी येथे झंजावती दौरा*

प्रतिनिधी:-

*भागातील रस्ते, पाणी प्रश्न आमदार होताच मार्गी लावणार*

येत्या 23 नोव्हेंबरला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून मला एक संधी द्या, मंगळवेढा तालुक्यातील रस्ते व पाणी प्रश्न आमदार होताच मार्गी लावणार असल्याचा शब्द अनिल सावंत यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, माजी नगरसेवक चंद्रशेखर कोंडुभैरी, कार्याध्यक्ष संतोष रंधवे, काँग्रेस अल्पसंख्याकचे मुबारक शेख, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष वृषाली इंगळे, माणिक गुंगे विविध गावांचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आदीजन उपस्थित होते.
उमेदवार अनिल सावंत पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार राज्यात येणार असून मतदारसंघातील सर्व प्रश्न मार्गी लागतील, मला मत म्हणजे शरद पवार साहेबांना मत आहे.
आपले एक मत मतदारसंघातील परिवर्तन घडवून आणणार आहे. प्रत्येक गावात आतापर्यंत खूप वेळा जाऊन अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत. आमदार झाले की या सर्व अडचणी सोडवण्यासाठी मी तत्पर असणार आहे.
शेतकरी केंद्र बिंदू मानून मी सर्व समस्या सोडवत आहे. बेरोजगार तरुणांसाठी काम देण्यासाठी प्रयत्न करणार असून येणाऱ्या काळात बेरोजगार युवकांसाठी मोठा उद्योग सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी दूध व्यवसाय केला आहे. येत्या काही दिवसात हा व्यवसाय प्रत्येक गावात सुरू करून शेतकरी बांधवांच्या दुधाला चांगला दर देणार आहे.
शरद पवार साहेबांचे मंगळवेढा तालुक्यावर विशेष प्रेम आहे त्यामुळे या मतदारसंघातील एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. आपण दिलेल्या संधीचे मी सोने करून आपल्यासमोर येईल.
मतदार संघातील विकास काय असतो हे मी आमदार झाल्यावर कळेल. माझ्यावर एकदा विश्वास ठेवा मी तुम्हाला सर्व प्रश्न मार्गी लावून दाखवतो असे आश्वासन अनिल सावंत यांनी दिली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here