प्रतिनिधी :-
समाधानदादांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांची अडीच वर्षात यशस्वी अंलबजावणी करून, पूर्ण झालेल्या, सुरु असलेल्या विकासकामांच्या माध्यमातून व प्रस्तावित कामांच्या पूर्ततेसाठी जनतेचा मतरुपी आशीर्वाद मिळवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या गावभेट प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने “भाजप महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधानदादा आवताडे” यांनी गुंजेगाव येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
महायुती सरकारच्या कल्याणकारी योजना व प्रकल्पच्या माध्यमातून गुंजेगाव येथे झालेल्या विकास कामांचा आढावा यावेळी समाधानदादांनी घेतला. तसेच पुढील काळात असेच अनेक ग्रामविकासाचे, कृषी विकासाचे व महिला सबलीकरणाचे प्रकल्प अधिक गतीने पाठपुरावा करून मार्गी लावण्यासाठी २० तारखेला महायुतीच्या ‘कमळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड जनाशीर्वादाने पुन्हा लोकसेवेची संधी द्यावी, अशी विनंती समाधानदादांनी केली.
सदर प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.