*भगिरथ भालके यांना जनतेची भक्कम साथ – खा.प्रणिती शिंदे*

प्रतिनिधी :—
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगिरथ भालके यांच्या गावभेट दौरा दरम्यान मारोळी येथे खा.प्रणितीताई शिंदे यांनी सभेस मार्गदर्शन करते वेळी त्यांनी भगिरथ भालके यांचा जनतेची भक्कम साथ ही विजयाची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेला,युवा शेतकरी,कष्टकरी कामगार महिला युवा युवती यांच्या विश्वासाचा,हक्काचा उमेदवार भगिरथ भालके यांनी आपल्या सामाजिक व राजकीय जीवनात प्रभावीपणे काम केले आहे.जनतेच्या सुख दुःखात सहभागी होणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी मतदार संघात ओळख निर्माण केली आहे. म्हणूनच त्यांना जनतेतून भक्कम साथ मिळाली आहे.
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी ‘हाताचा पंजा ‘ या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे त्यांनी उपस्थितांना केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here