शेतकरी आत्महत्या वक्तव्याचा पंढरपुरात शिवसेना (ऊबाठा) कडून निषेध

*पंढरपूर तहसील कार्यालयावर शिवसेनेचे आंदोलन*

महेश कदम
पंढरपूर:-
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या अंत्यविधीलाही जाऊ नका, अशा आशयाचे वक्तव्य आ. गायकवाड यांनी केल्याचा आरोप करत पंढरपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
आ. गायकवाड यांना तातडीने विधानसभेतून बडतर्फ करण्यात यावे, बळीराजाचा अवमान करणाऱ्या वाचाळ वीर आ. गायकवाड यांच्यावर त्वरित कारवाई करावी या मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांच्याकडे देण्यात आले.
दुष्काळ, अवकाळी पाऊस, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकला आहे. माल मातीमोल दराने विकावा लागत असल्याने आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारख्या संवेदनशील विषयावर अवमानकारक भाष्य करणे योग्य नाही असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे यांनी व्यक्त केले
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, तालुकाप्रमुख बंडू घोडके, उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे, शहरप्रमुख युवराज गोमेवाडीकर, अर्जुन भोसले, इंद्रजित गोरे, रणजित कदम, संजय घोडके, नागेश रितुण्ड, नामदेव चव्हाण, उत्तम कराळे, समाधान गोरे, दिलीप उघाडे, भारत कदम, संजय पवार, विजय बागल, स्वप्नील गावडे, कल्याण कदम,अशपाक मुजावर, महेश कांबळे, आकाश माने, ऋषिकेश कवडे, जालिंदर शिंदे, सचिन मोरे, सचिन शिंदे, सतीश पाटील आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here