भाळवणीत सुनीता पाटील आणि मधुरा पवार यांचा झंजावाती प्रचार
पंढरपूर (प्रतिनिधी)
युवराज पाटील गटाच्या श्री विठ्ठल अण्णाभाऊ विकास पॅनलने प्रचारात सुरुवातीपासूनच बाजी मारली आहे. या पॅनलचे प्रमुख युवराज पाटील आणि ॲड. दीपक पवार हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यानिमित्ताने सौ. सुनिता युवराज पाटील आणि सौ. मधुरा दीपक पवार यांनी बुधवारी भाळवणी गावचा प्रचार दौरा पूर्ण केला. पॅनल प्रमुखांच्या पत्नी असल्याने, शेतकरी सभासदांनी त्यांचे घरोघर स्वागत केले.
विठ्ठल कारखान्याची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. मंगळवारी प्रत्येक पॅनलला चिन्हांचे वाटप करण्यात आले. रातोरात मतपत्रिकांचे नमुने छापून प्रत्येक पॅनलने प्रचारास सुरुवात केली आहे. येत्या ५ जुलै रोजी मतदान असल्याने, मोजके दिवस प्रचारासाठी उरले आहेत.
श्री विठ्ठल आण्णाभाऊ पॅनलचे नेते युवराज पाटील आणि ॲड. दीपक पवार हेही या निवडणुकीत उमेदवार आहेत. हे दोन्ही उमेदवार आणि एकूणच पॅनलच्या प्रचारासाठी युवराज पाटील यांच्या पत्नी सुनिता पाटील आणि दीपक पवार यांच्या पत्नी मधुरा पवार याही प्रचारात उतरल्या आहेत. बुधवारी सकाळपासूनच भाळवणी गावात त्यांनी प्रचारास सुरुवात केली. घरोघर मतपत्रिकांचे नमुने दाखवत मतदान करण्याचे आवाहन केले. पॅनल प्रमुखांच्या पत्नी असल्याने शेतकरी सभासदांनी घरोघर त्यांचे यथोचित स्वागत केले.
चौकट
विठ्ठलच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या निवडणुकीतील पॅनलप्रमुख युवराज पाटील आणि ॲड. दीपक पवार यांच्या अर्धांगिनीही प्रचारात सहभागी झाल्या आहेत. बुधवारी सकाळीच त्यांनी भाळवणी गावात प्रचारास सुरुवात केली. घरोघर जाऊन महिला वर्गाबरोबर हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पाडला.



















