मुख्यमंत्री सहायता निधीस श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत 2 कोटी रुपयांची मदत सुपूर्द- सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

मुंबई, दि. 04: राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित नागरिकांना मदत मिळावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या वतीने शासनाच्या मान्यतेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 कोटी रुपयांचा धनादेश आज दिनांक 4 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत आणखी एक महत्त्वपूर्ण योगदान देण्यात आले. मंदिर समितीच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांनी आपल्या एक दिवसाच्या वेतनाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 220 अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनातून संकलित झालेला रुपये 2 लाख 50 हजारचा धनादेश देखील मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यात आला.

या प्रसंगी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, भागवतभूषण अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, नगराध्यक्षा तथा पदसिद्ध सदस्या प्रणिता भालके तसेच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here