सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले मागण्याचे निवेदन.
उद्या मराठी पत्रकार संघ सर्वत्र ठिकाणी काळ्याफिती लावून करणार वार्तांकन.
पंढरपूर : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकन करण्यास गेलेल्या अभिजीत सोनवणे, किरण ताजने, योगेश खरे या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना ए.एस मल्टी सर्विसेस कंपनीच्या ठेकेदाराच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून बाचाबाची करून भ्याड हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
या घटनेचा राज्यभरात मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त केला जात आहे.
सोलापूर येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून विविध मागण्यांचे निवेदन सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले आहे.
याप्रसंगी मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव हरिभाऊ प्रक्षाळे, पंढरपूर तालुका अध्यक्ष मिलिंद यादव, मराठी पत्रकार संघाचे पंढरपूर शहर सचिव अपराजित सर्वगोड,उपाध्यक्ष राजेंद्र ढवळे, सहआध्यक्ष विनोद पोतदार, दिव्य मराठीचे उपसंपादक विजय साळवे, उपसंपादक संजय पवार, दिव्य मराठीचे तेजस मुदे आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.
याप्रसंगी मराठी पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या निवेदनामध्ये शासनाने पत्रकार संरक्षण कायदा सन 2019 मध्ये करून ही अनेक ठिकाणी वारंवार पत्रकारावर हल्ले होत आहेत.
त्र्यंबकेश्वर येथे झालेला हल्ला हा एक शासनाच्या व पत्रकारांच्या दृष्टीने निंदनीय प्रकार आहे. पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ मानला जातो परंतु अशा काही गाव गुंडाकडून वारंवार पत्रकारावर हल्ले होत असल्याने चौथ्या स्तंभाचा आवाज दाबण्याचे काम असे काही दृष्ट ठेकेदार व राजकीय लोक करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी एक पत्रकारांची प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृती समिती नेमावी. या कृती समितीमध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्षस्थानी असावेत. तसेच या समितीमध्ये विविध संघटनेचे पत्रकार असले पाहिजेत. त्याचबरोबर पोलीस खात्याचाही एखादा वरिष्ठ अधिकारी यामध्ये असले पाहिजेत. या समितीमध्ये राजकीय नेतृत्व किंवा पुढारी असू नये तरच या समितीला चांगल्या दृष्टीने पत्रकारांना न्याय देता येईल. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ज्या गाव गुंड आरोपींनी पत्रकार हल्ला केला आहे. त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई शासनाने करावी. यापुढे पत्रकारांवर हल्ला होणार नाही याची कायद्याने जबाबदारी शासनाने घ्यावी
अशा अनेक विविध मागण्यांचे निवेदन सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले आहे.