पंढरपूर :-
विठ्ठल कारखान्याच्या ४४ व्या गळीत हंगामाचा बाॅयलर अग्निप्रदीपन ह.भ.प. श्री. विठ्ठल महाराज चवरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. होमहवन पूजा कारखान्याचे संचालक सचिन व सीमाताई वाघाटे व संचालक समाधान व माधुरीताई गाजरे या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आले.
गुरसाळ्याच्या माळरानावर सुरू केलेल्या या कारखान्यासाठी संस्थापक चेअरमन, कर्मवीर स्व.औदुंबर अण्णा पाटील, माजी चेअरमन स्व.वसंतदादा काळे, माजी चेअरमन स्व.आमदार भारत नाना भालके, व्हा.चेअरमन स्व.यशवंत भाऊ पाटील, स्व.कृष्णांत भाऊ पुरवत या दिग्गज नेत्यांचे मोठे योगदान लाभले.
पंढरपूरचा राजवाडा म्हणून ओळखला जाणारा कारखाना सुरळीत चालल्यामुळे कारखान्याचे सभासद, कामगार, पंढरपूरातील छोटे-मोठे व्यापारी यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे. सहकारामुळे आज पंढरपूरची बाजारपेठ कायम गजबजलेली व भरलेली असते.
सध्या कारखान्याची गाळप क्षमता ७ हजार ५०० मे.टन असून यंदा १४हजार मे.टन गाळप क्षमता वाढविल्यामुळे सभासदांचा ऊस गाळप करण्यासाठी अजून मदत होईल. यंदा गाळप हि उच्चांक होईल. यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाला आहे. यंदाच्या गळीत हंगामात ६ कोटी लाईट युनिटचे उद्दिष्ट असून इथेनॉल प्रकल्पाचे १०० केलपीडीचं काम लवकरच पूर्णत्वास होईल.
कारखान्याचा चेअरमन या नात्यानं वार्षिक अहवालाचं वाचन करून सभासदांना दाखवलं सर्व सभासदांनी हात वर करून मंजूर आहे, यांचा होकार देत कारखान्याच्या पारदर्शक कारभारावर सर्वांनी विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो. सभासदांनी दाखविलेल्या विश्वासावर कारखाना प्रगतीपथावर जात आहे.
आज चेअरमन म्हणून असलो तरी, या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून जे जे काम करायचं आहे. ते प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे करत आलो आहे. येणाऱ्या गळीत हंगामासाठी कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, वाहतूक तोडणी ठेकेदारांना शुभेच्छा दिल्या.