प्रतिनिधी:-
आज शुक्रवार अश्विन कॄ ११ दिनांक १७ ऑक्टोंबर २०२५ रोजी रमा एकादशी व वसु बारस रोजी मुंबई मातोश्री येथे मा. शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री श्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रतील जिल्हाप्रमुखांची बैठक संपन्न झाली. त्यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने दिपावलीच्या शुभेच्छा व मा. शिवसेना पक्ष प्रमुख श्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सत्कार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य व शिवसेना जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग, पंढरपूर पंचायत समिती सदस्य, श्री संभाजी शिंदे यांचे तर्फे “श्री” ची प्रतिमा, उपरणे, हार व दैनंदिनी देऊन करण्यात आला. त्यावेळी शिवसेना नेते श्री चंद्रकांत खैरे साहेब व शिवसेना सोलापूर संपर्क प्रमुख श्री अनिलभाऊ कोकीळ साहेब, सोलापूर जिल्हा प्रमुख, माढा विभाग श्री धनंजय डिकोळे व मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थीत होते. त्यावेळी घेतलेले छायाचित्र



















