*एकुण १५ लाख रूपयचा मुद्देमाल मुळ मालकांचे ताब्यात दिले*.
प्रतिनिधी:-
पंढरपुर शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे अन्वेशन प्रकटीकरण शाखेचे मदतीने सोलापुर जिल्हयातील, पंढरपुर शहर पोलीस ठाणेकडील व इतर जिल्हयातील चोरीस गेलेल्या मोटार सायकलीपैकी ७० मोटार सायकली हया गुन्हेगाराकडून जप्त करून त्यांचे मुळ मालकांचा शोध घेवुन मुळमालकांचे ताब्यात सदरच्या मोटार सायकली दिलेल्या आहेत. सदरच्या एकुण १५ लाख रूपयचा मुद्देमाल मुळ मालाकांचे ताब्यात देण्यात आलेला आहे.
सदरची कामगीरी ही मा. अतुलचंद्र कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सोो, सोलापुर ग्रामीण, मा. प्रितमकुमार यावलकर, अपर पोलीस अधिक्षक सो।, सोलापुर ग्रामीण, मा. डॉ. अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी सोो, पंढरपुर विभाग, विश्वजीत घोडके, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपुर शहर, अशिष कांबळे, सहा. पोलीस निरीक्षक, सपोफौ राजेश गोसावी, सपोफौ शरद कदम, पोह ताजुद्दीन मुजावर, पोह प्रसाद औटी, पोह सुरज हेंबाडे, पोह सचिन हेंबाडे, पोह दादासाहेब माने, पोह विठ्ठल विभुते, पोकॉ शहाजी मंडले, पोकों समाधान माने, पोकों बजरंग बिचुकले, पोकों निलेश कांबळे, पोकॉ गोरख लोखंडे यांनी केलेली आहे.