*सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांचा संयुक्त उपक्रम*
पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात एखाद्या आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री नंबर 18002703600 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे व गुन्हे गुन्हेगार यांना तात्काळ जेरबंद करणे शक्य होणार आहे.कारण आता जिल्ह्यात सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांचा संयुक्त उपक्रमाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून याबाबत तालुक्यातील 24 गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, माझी सरपंच , माझी उपसरपंच , विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी, युवा वर्ग, महिला यांना ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
वाखरी ता.पंढरपूर येथील सदगुरु मंगल कार्यालयात
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संक्ल्पनेतुन, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांचे प्रोत्सानामुळे सोलापुर जिल्हा ग्रामीण पोलीस, जिल्हा परिषद सोलापुर व जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाब पंढरपुर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील 24 गावांमधील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांचेसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री. डी. के. गोर्डे (नाशिक) यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले, सर्व सरपंच व नागरिकांनी यंत्रणेत पुढील ४८ तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. तसेच उत्तम सुतार यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा, जिल्हाप्रमुख विक्रमसिंह घाटगे ग्रामसुरक्षा अधिकारी यांनीही सदरच्या प्रात्यक्षिक दाखविणे ॲप इन्स्टॉल करणे फार्म भरून घेणे याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास सर्व 24 गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, माझी सरपंच , माझी उपसरपंच , विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी, युवा वर्ग व महिला उपस्थित होते.
तालुक्यातील सर्व गावांमध्ये नागरीकांना सतर्क करण्यासाठी सायरन बसवण्यात आलेले आहेत. याही ग्रामसुरक्षा यंत्रणेला जास्तीत जास्त प्रतिसाद देण्याचे आवाहन केलेले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय अ.जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुखदेव गोदे, सपोफौ मारुती दिवसे , पोहेकॉ तैबुद्दीन मुंडे तसेच सर्व बीट अंमलदार व पोलीस अंमलदार यांनी केले.
गेल्या 9 वर्षांत पुणे, नाशिक, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील 3500 हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदणी केलेल्या नागरिकांने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईल वर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटनां घडत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.
ग्राम सुरक्षा यंत्रणेची फायदे
घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे,गावातील कार्यक्रम / घटना विना विलंब नागरी स्थांना एकाच वेळी कळणे,अफवांना आळा घालणे,प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे,पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.
ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये –
संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा,गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत,संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 1800 270 3600,यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो,संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो,दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता , ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते,नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात,नियमाबाह्य दिलेले संदेश/ अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत,एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य,वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या १० किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो,घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही तोपर्यंत रिंगn वाजते,संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.