*पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई- दीड लाखाची दारू जप्त*

आषाढी वारीच्या अनुषंगाने अवैध दारू साठ्यावर पंढरपूर तालुका पोलिसांची धडाकेबाज मोठी कारवाई 30 बॉक्स दारू एकूण किंमत रुपये 1,50,672 /- रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे.

आज दिनांक 29 जून 2025 रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे पंढरपूर ते कुर्डूवाडी जाणारी रोडवर हॉटेल शुभेच्छा पाठीमागे असलेले पत्राशेड खोलीमध्ये मौजे भटुंबरे येथे या गावाचे शिवारातील इसम नामे सतीश रामा वसेकर वय 41 वर्ष रा. नारायण चिंचोली तालुका पंढरपूर याचे वस्तीतील घरामध्ये अवैधरित्या दारू विक्रीसाठी देशी विदेशी दारूचा साठा असल्या बाबतची खात्रीशीर माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाल्या नंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी तात्काळ माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी पोलिस अधिकारी स्टाफसह छापा मारून एकूण 1,50,672/- रुपये किमतीचा मुद्देमाल मौजे भटुंबरे गावचे शिवारामध्ये मॅकडोनाल्ड व इतर कंपनीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या एकूण 30 बॉक्स देशी-विदेशी दारू त्याची किंमत एकूण रुपये 1,50,672/- रुपये किमतीचा दारूच साठा अवैध विक्री करण्यासाठी बाळगलेल्या अवस्थेत मिळून आल्याने सर्व दारूचा साठा पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून इसमनामेसतीश रामा वसेकर वय 41 वर्ष रा. नारायण चिंचोली तालुका पंढरपूर याचे विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पीएसआय भारत भोसले सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश रोकडे गजानन माळी सुधीर शिंदे सुहास देशमुख पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी महिला पोलीस हवालदार मनेरी मॅडम पोलीस कॉन्स्टेबल महेश गोडसे पोलीस होमगार्ड सुनील कवडे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here