पंढरपूर:-
पंढरपूर तालुक्यातील वाखरी ग्रामपंचायत हद्दीतील बावन्न एकर येथे श्री.संत बाळूमामा मंदिर असून येथे तिर्थक्षेञ आप्पाचीवाडी कुर्ली व मेतके येथे भाकणूक सांगणारे भगवान महाजन ढोणे व सिद्धार्थ महाराज यांच्या भाकणूकीबरोबर महाभंडारा व तसेच नाथांचा दरबार या कार्यक्रमाचे आयोजन बावन्न एकर वाखरी येथील बाळूमामा ठाणचे आप्पा महाराज व माने-कैकाडी स्नेह परिवाराच्यावतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम भगवान ढोणे महाराज व सिद्धार्थ महाराज यांच्या आगमना नंतर पालखी सोहळा मिरवणूकीस सुरूवात करण्यात आली. हा पालखी सोहळा इसबावी -पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी विसावा मंदिराला प्रदक्षिणा घेऊन नंतर बाळूमामा ठाण येथे आल्यानंतर दोन्ही महाराजांचा भाकणूक कार्यक्रम संपन्न झाला.आरती नंतर नाथांचा दरबार भंडारा महाप्रसाद झाला.
या ठिकाणी आज सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवत येथील भक्तांच्यावतीने रक्तदान शिबीर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.रक्तदान केलेल्या सर्व भाविक भक्तांचे अक्षय ब्लड बँकेच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.