*आषाढी यात्रा २०२४ निमित्त भाविकांना नम्र आवाहन ” मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव.*

पंढरपूर ( प्रतिनिधी):-
तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या भावीक भक्तांना पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छते विषयी घ्यायची काळजी व आपले आरोग्य जपण्यासाठी वारकरी साहेब भक्ताने स्वच्छतेला महत्त्व देऊन आपले आरोग्य जपावे. असे आवाहन करत पंढरपूर नगर परिषदेने भावीक भक्तांना काही नम्र सूचना केलेले आहे त्या पुढील प्रमाणे.

वारकरी भाविक भक्तांनी उघड्यावर शौच करु नये तसेच शिळे अन्न उघड्यावर टाकू नये, धोकादायक इमारतीमध्ये राहू नये, कचरा गाडीचा कचरा टाकण्यासाठी वापर करावा व कचरा गाडीमध्ये आपला कचरा टाकावा अन्यत्र उघड्यावर कचरा टाकू नये, शिळे अन्न खाऊ नये नदीचे व बोरचे पाणी पिऊ नये. नगरपालिकेने दिलेल्या टँकर मधून पिण्याचे पाणी प्यावे व नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा, वारकरी बांधवांनी पत्रावळी व द्रोण याचा वापर करावा, थर्माकोल व प्लास्टिकच्या साहित्याचा वापर करू नये.

वारकरी बांधवांनी आपले पंढरपूर शहर स्वच्छ राहण्यासाठी सहकार्य करावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

भाविकांच्या साठी पार्किंगची सुविधा अंबाबाई पटांगण सांगोला रोड एम एस ई बी परिसर, कुंभार घाट मरीआई मंदिर परिसर गजानन महाराज मठाच्या पाठीमागील भागामध्ये पार्किंगची सुविधा केलेली आहे रेल्वे मैदान तसेच कराड रोड वेअर हाऊस जवळ पार्किंगची सोय इस बावी वाखरी रोड विसाव्याच्या समोरील भागामध्ये पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. शहरातील विविध भागांमध्ये वारकरी बांधवांनी आपले वाहन पार्किंग करावे असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here