पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील युवा उद्योजक शिवाजी बाबर यांची शिवसेना शिंदे गटाच्या पंढरपूर तालुकाप्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
माढा येथील शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटाच्या पंढरपूर तालुका प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, उपजिल्हाप्रमुख महावीर देशमुख, माढा तालुका प्रमुख शंभू साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेच्या पंढरपूर तालुका प्रमुख पदी निवड झाल्या बद्दल शिवाजी बाबर म्हणाले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत समन्वयक शिवाजीराव सावंत व जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे काम मी करणार असून संघटनेत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे कामे करणे हेच माझे उद्दिष्ट राहणार आहे संघटनेसाठी पूर्णवेळ काम करणारा असून पंढरपूर तालुक्यात संघटनेतून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.