*राष्ट्रवादीत काँग्रेस (शरद पवार गट) कडून अनिल( दादा) सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल*

पंढरपूर :-

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीत काँग्रेस शरद पवार गट यांच्या कडून अनिल सावंत यांनी सोमवारी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादीत काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवार अनिल सावंत यांनी आज पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणी, संत चोखा मेळा यांचे चे दर्शन घेऊन तसेच छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, महात्मा जोतिबा फुले,विश्व रत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,भाई राऊळ यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून, दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
तत्पूर्वी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या चरणावर ठेवून दर्शन घेतले. याचबरोबर त्यांनी सर्व महापुरुषांना पुष्पहार घालून अभिवादन करून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी शक्ती प्रदर्शन न करता आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मतदार संघात भेडसावणारे अनेक प्रश्न, बेरोजगारीची समस्या सोडवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल असा विश्वास दिला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here